Gold Price Today | खूशखबर ! लग्नसराईतही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | गेल्या दोन महिन्यात सोन्याचा दर (Gold Price Today) घटत असताना पाहायला मिळालं. ऐण सनात सोन्याचा दर कमी होता. आजही लग्नसराईच्या सीजनमध्ये सोन्याचा भाव उतरला आहे. एकीकडे मागणी वाढलीय. तर दुसरीकडे सोन्याचा भाव घसरला आहे. आज (मंगळवारी) सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 0.05 टक्क्यांनी घसरण होऊन 47,890 रुपये प्रति तोळा पर्यंत ट्रेड करत आहे. तसेच चांदीच्या भावातही (Silver Price) घसरण झाली आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price) उतरत आहेत. त्यामुळे यंदा लग्नसराईच्या सीजनमध्ये सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (MCX) वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज सोन्याचा दर सुमारे 8310 रुपयांनी कमी आहे. म्हणजे सोनं स्वस्त झालं आहे.

 

काय आहे सोन्या-चांदीचा भाव?

आजचा सोन्याचा दर – 47,890 रुपये (प्रति तोळा)

आजचा चांदीचा दर – 61,221 रुपये (प्रति किलो)

 

दरम्यान, ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात.
तसेच, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल,

 

Web Title :- Gold Price Today | gold and silver price declined today on 7th december gold rate down by 8310 rs per 10 gram from record high

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या