फक्त 2 दिवसात 1800 रूपयांनी कमी झाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक बाजारपेठेत घसरल्यानंतर आज देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली. एमसीएक्सवरील जून वायदा बाजाराची किंमत ०.५ टक्क्यांनी म्हणजेच २३५ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली येत ४५,५०० रुपये झाली आहे. पहिल्या सत्रातही सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे १,६०० रुपयांची घट नोंदवली गेली होती. अशाप्रकारे दोन दिवसांत १८०० रुपये प्रति १० ग्रॅमची घट झाली आहे.

डेरिव्हेटीव्ह मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगचा बोलबाला
मागील आठवड्यातच ४७,३२७ रुपये प्रति 10 ग्रॅम विक्रमी पातळी गाठल्यानंतर भविष्यातील डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये नफा बुकिंग दिसून येत आहे. चांदीच्या किंमतीत आज एमसीएक्सवर ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदीची नवीन किंमत ४२,९४० रुपये प्रति किलो असून डॉलरमध्ये ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यानंतर गुंतवणूकदारांना इतर चलनांमध्ये सोने खरेदी करणे महाग होत आहे.

जागतिक बाजारपेठेची परिस्थिती काय आहे?
जागतिक बाजारपेठेत आज सोन्याची किंमत सुमारे एक आठवड्याच्या किमान पातळीवर पोहोचली असून लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्था उंचावेल असा अंदाज आता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. सोमवारी जागतिक बाजारात स्पॉट सोन्याचा दर ०.५ टक्क्यांनी घसरला आणि त्यानंतर १,६७५.९२ डॉलर औंसवर आला. मागचे सत्र मिळून ही घसरण सुमारे २ टक्क्यांपर्यंत पोहोचली. तर चांदीच्या किंमतीत देखील ०.३ टक्क्यांची घट झाली आहे आणि त्यानंतर १५.०८ डॉलर औंसवर गेली.

लॉकडाऊनमुळे बंद आहे स्पॉट गोल्ड मार्केट
भारतात लॉकडाऊनमुळे स्पॉट गोल्ड मार्केट बंद आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे जगातील बर्‍याच देशांमध्ये फिजिकल गोल्डची मागणी कमी होत आहे. दरम्यान सरकारने आज आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी सॉवरेन गोल्ड बाँडचा पहिला ट्रांच उघडला आहे.

सॉवरेन गोल्ड बॉंड खरेदी करण्याची संधी
सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम २०२०-२१ च्या पहिल्या सीरिजची इश्यू प्राइस ४,६३९ रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. हे सब्सक्रिप्शन २४ एप्रिलपर्यंत राहील आणि २८ एप्रिल रोजी बंद केले जाईल. ऑनलाइन सॉवरेन बॉंड खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ५० रुपये प्रति १० ग्रॅमचा डिस्काऊंट देखील मिळेल.