ऐन धनतेरसला सोनं ‘महागलं’, चांदी देखील ‘चकाकली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते, यामुळे मागणी वाढल्याने आज सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. ऐन खरेदीच्या दिवशी म्हणजेच धनतेरसला सोने 220 रुपयांनी महागले. सणासुदीच्या दरम्यान सोन्या चांदीच्या किंमतीत तेजी आली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोने 220 रुपयांना वाढून 39,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, गुरुवारी सराफ बाजारात सोने 75 रुपयांनी वाढले त्यामुळे 38,945 रुपये झाले होते. धनतेरसला दागिण्यांच्या लिवालीमध्ये तेजी आली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

चांदी देखील महागली –
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव 220 रुपयांनी वाढले, फक्त सोनंच नाही तरी चांदीच्या किंमती देखील वाढल्या,चांदीच्या किंमतीत 670 रुपयांनी तेजी आली आहे. त्यामुळे चांदी 47,680 रुपये प्रति किलो झाली. गुरुवारी चांदी 110 रुपयांनी महागली होती त्यामुळे 46,410 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार भाव –
धनतेरसला सोने, चांदी आणि इतर किंमती वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या कारणाने सोन्याची, चांदीची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराची तुलना केली की न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत, तेथे सोने 1,506 डॉलर प्रति औंस होते तर चांदी 18.05 डॉलर प्रति औंस राहिली.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा