Gold Silver Price Today | सोन्या – चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. त्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज (बुधवार) सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याचा दर (Gold Price) 573 रुपयांनी वाढून 51,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीचा भावही (Silver Price) 1,287 रुपयांनी वाढून 67,257 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमती बदलत असताना दिसत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,921 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 24.79 डॉलर प्रति औंस होता. दरम्यान, बुधवारी कॉमेक्स ट्रेडिंगमध्ये सोन्याची स्पॉट किंमत किरकोळ वाढून $1,921 प्रति औंस झाली. अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांनी दिली.

 

दरम्यान, स्थिर मागणी आणि सततच्या चढ्या किमतींमुळे सोन्याचे दागिने किरकोळ विक्रेत्यांचे उत्पन्न 2022 – 23 या आर्थिक वर्षात 12 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांचे उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021 – 22 मध्ये 20 – 22 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचं पतमानांकन एजन्सी क्रिसिलने सांगितले आहे.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price today gold jumps rs 573 silver rallies rs1287

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा