Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदी ‘वधारली’, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजरात सोन्याचांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरताना दिसत होत्या. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दराच घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज चांदीच्या दरात बदल झाला आहे. आज (बुधवारी) सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र वधारले आहेत. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,500 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 64,400 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचली आहे.

गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर (Gold Silver Price Today) उतरले आहेत. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील घट होताना पाहायला मिळालं. सोन्याचे दर उतरले असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्यात एक सुवर्णसंधी मिळाली आहे. दसरा कालावधीत सोन्याचे दर किंचीत वाढले असले तरी ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. यामुळे सराफ व्यावसायिक देखील आनंदीत होते. आजही सोन्याचे दर कमीच आहेत. मात्र चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

Colleges Reopen In Maharashtra | राज्यभरातील महाविद्यालये आजपासून खुली; 50 % पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यात 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22  कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा (Gold Silver Price Today) असतो.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,620 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,860 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,500  रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,500 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,500 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,400 रुपये.

हे देखील वाचा

Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Silver Price Today | gold rate price today on 20 october 2021 konw rates of gold and silver in mumbai, pune and nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update