Homeताज्या बातम्याGold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट...

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून आली. आज मात्र सोन्या-चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आता तोच भाव वाढला आहे. आज (गुरूवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,940 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 65,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरत असल्याचं दिसलं. दरम्यान आज सोन्या-चांदीचा दर वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आल्याने सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून आली. दरम्यान गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा भाव कमीच आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,120 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,630 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,940 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,940 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,940 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,940 रुपये

आजचा चांदीचा भाव – 65,000 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 13 january 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News