सोनं ‘महागलं’, चांदी झाली ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी तेजी आली आहे. गुरुवारी दिल्लीत सराफ बाजारात 10 ग्रॅम सोनं 12 रुपयांनी महागलं. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदी जवळपास 65 रुपयांनी स्वस्त झाली.

सोन्याचे दर
गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 38,804 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर बुधवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,475.50 डॉलर प्रति औंस झाली तर चांदी 16.94 डॉलर प्रति औंस झाली.

चांदीचे दर
औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीच्या दरात घसरणं झाली आहे. चांदी 65 रुपयांनी स्वस्त झाली असून 45,485 रुपये झाली. बुधवारी चांदी 45,550 रुपयांवर बंद झाली होती.

HDFC सिक्योरिटीजचे सीनिअर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की रुपयात कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीला सपोर्ट मिळाला आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी घसरला. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय सराफ बाजारात सोनं आणि चांदीचे दर स्थिरावले आहेत. ते म्हणाले की चीन आणि अमेरिका व्यापार कराराची चिंता कमी झाल्याने सोनं ट्रेंडिंग रेंजमध्ये आहे.

सरकार सोन्यासंबंधित या योजनेच्या तयारीत
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की ते खास प्रोगाम आणण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सांगितले की जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी इंडस्ट्रीला सांगू इच्छितो की सरकारच्या सहाय्याने अशी स्कीम आणण्यास मदत करा ज्यामुळे लोकांकडे आपल्या घरात जे सोनं आहे ते आपल्या मर्जीने जमा करतील, फिक्स डिपॉजिटच्या पद्धतीनं त्यावर व्याज मिळवतील आणि जेव्हा हवं तेव्हा आपलं सोनं घरी घेऊन येऊ शकतील.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/