खुशखबर ! ‘सोन्या-चांदी’च्या किंमतीत कमालीची ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरणं आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणं झाल्यानंतर सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 233 रुपयांनी स्वस्त झालं. सोन्यासह चांदीच्या किंमतीत देखील घसरणं आली आहे. चांदी 157 रुपयांनी स्वस्त झाली. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत तेजी आली होती. शुक्रवारी सोनं 75 रुपयांनी महागलं होतं.

सोन्याचे दर –
सोमवारी सराफ बाजारात 24 कॅरेट सोनं 41,565 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आज सोनं 233 रुपयांनी स्वस्त झाली. आंतरराष्ट्रीय सराफ बाजारात सोनं 1,579 डॉलर प्रति 28.33 ग्रॅम झाले तर चांदी 17.74 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
औद्योगिक मागणी घटल्याने सोमवारी दिल्ली सराफ बाजारात चांदी 47,170 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. आज चांदीच्या दरात 157 रुपयांची घसरणं झाली.

का स्वस्त झाले सोने चांदी –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की चीनमध्ये थैमान घातलेला कोरोना व्हायरस आटोक्यात येत आहे आणि त्यावर उपचार यशस्वी होत असल्याच्या बातम्या येत असल्याने सोनं चांदी स्वस्त होत आहे.

10 महिन्यात सोन्याची आयात 9 टक्क्यांनी घटली –
– भारतात सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षात एप्रिल – जानेवारी दरम्यान जवळपास 9 टक्क्यांनी घटल्याने 24.64 अरब डॉलर राहिली.
– यापूर्वी आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये याच दरम्यान आयात 27 अरब डॉलर होती.
– सोन्याची आयात कमी झाल्याने देशातील व्यापार कमी होऊन 133.27 अरब डॉलर राहिला तर एक वर्षांपूर्वी याच दरम्यान हा व्यापार 163.27 अरब डॉलर होता.
– मागील वर्षी सोन्याची आयात जुलैमध्ये घसरली होती. मागील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सकारात्मक वाढ नोंदवली गेली.
– तर डिसेंबरमध्ये जवळपास 4 टक्के आणि या वर्षी जानेवारीत 31.5 टक्के घसरणं झाली.