शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आजपासून 15 दिवसात 3 लाखाचं स्वस्त व्याजदाराचं ‘कर्ज’ आणि ‘किसान क्रेडिट कार्ड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून (1 सप्टेंबर) शेतकऱ्यांना 15 दिवसात केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बँका आता शेतकऱ्यांना 15 दिवसात कार्ड उपलब्ध करुन देतील. एखाद्या व्यकतीकडून अथवा सावकाराकडून महाग कर्ज घेण्यापेक्षा बँकामधून स्वस्त कर्ज घेऊन ते शेतीसाठी वापरु शकतील. यासाठी बँकांना सरकारने सक्त निर्देश दिले आहेत की शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना केसीसी देणे. किसान क्रेडिट कार्डसाठी सरकारने गावाच्या स्तरावर अभियान चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ दिवसात मिळणार केसीसी –
शेतकऱ्यांना केसीसी मिळावे म्हणून गावात जेथे कॅम्प लावण्यात येईल त्यात शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांचे ओळखपत्र, राहिवासी प्रमाण पत्र, आधार कार्ड, जामिनीचे रेकॉर्ड आणि फोटे अशी कागद पत्रे लागतील. याच कागदपत्रांच्या आधारे बँकांना शेतकऱ्यांना केसीसी द्यावे लागेल. जिल्हा स्तरीय बँकर्स समिती गावात कॅंप लावेल. तर राज्य स्तरीय समिती याची तपासणी करेल. नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, आता बँकांना अर्ज केल्यानंतर १५ दिवसात केसीसी देणे आवश्यक आहे.

सर्वात स्वस्त असेल केसीसी लोन –
शेती करणाऱ्या व्याजदर तसे तर ९ टक्के आहे. परंतू सरकार यात २ टक्के सब्सिडी देते. अशाने हे कर्ज ७ टक्के होते. परंतू वेळेत परत केल्यास ३ टक्के आधिक सूट मिळते, यामुळे वेळत कर्ज परतावा करणाऱ्यांना ४ टक्के व्याजदर राहिलं. कोणताही सावकार एवढे स्वस्त व्याजाने कर्ज देत नाहीत. यामुळे जर शेतकऱ्यांनी बंधवाना कर्ज हवे असेल तर या केसीसीचा लाभ घ्यावा यात तुम्हाला स्वस्त व्याजदरात ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –