रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता जनरल डब्ब्यातही मिळणार ‘सुपर-डुपर’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जनरल डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. जनरल डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आता हाच त्रास कमी करण्यासाठी रेल्वे ने खास व्यवस्था सुरु केली आहे. रेल्वे ने ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ च्या आधारावर बायोमीट्रिक टोकन सिस्टम ची सुरुवात केली आहे. याची माहिती स्वतः रेल्वे मंत्र्यांनी एका व्हिडिओसहित ट्विटरद्वारे दिले.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने मिळणार सीट :
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या ट्विट प्रमाणे रेल्वेच्या जनरल डब्या ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर असून गर्दीत धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीच्या त्रासापासून सामान्य नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. रेल्वे ने बायोमीट्रिक टोकन सिस्टम सुरु केली असून यामुळे प्रवाशांना फिंगरप्रिंट च्या साहाय्याने टोकन दिले जाणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून त्यामध्ये जनरल डब्ब्यांमध्ये सीट मिळवण्यासाठी उडणारी गडबड दाखवली आहे. त्याचबरोबर टोकन सिस्टिम चा वापर कसा करावा हेदेखील सांगितले आहे.

सध्या मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस स्टेशन वर आहे ही सुविधा :
रेल्वेच्या जनरल डब्यात जागा मिळवणे म्हणजे एक अत्यंत अवघड कसरत बनली असून सण-वाराच्या दिवशी तर जीवघेणी परिस्थितीच उद्भवते. अशात ही व्यवस्था अत्यंत सोयीची असणार आहे. ही सुविधा सध्या महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस स्टेशन वर उपलब्ध आहे. या सिस्टिम नुसार
प्लॅटफॉर्म वर आरपीएफ स्टाफ समोर सीसीटीव्ही समोर एक काउंटर लावलेले असते ज्यामध्ये टोकन सिस्टम ची व्यवस्था असते. हे पोर्टेबल असून एका जागेतून दुसऱ्या जागी हलवता देखील येऊ शकते.

टोकन चे वाटप संबंधित ट्रेन येण्याआधी ६० ते ९० मिनिटे आधी सुरु होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणाने जागा संपल्यावर ते बंद होईल. ट्रेन प्लॅटफॉर्म वर आल्यानंतर या टोकनच्या आधारावर प्रवाशांना एकेक करून बसायला सीट दिली जाईल.
सध्या हि व्यवस्था खालील ट्रेन साठी उपलब्ध करून देण्यात अली आहे –

अमरावती एक्‍सप्रेस (Mumbai Central)
जयपुर सुपरफास्‍ट एक्‍सप्रेस (Mumbai Central)
करनावति एक्‍सप्रेस (Mumbai Central)
गुजरात मेल (Mumbai Central)
गोल्‍डन टेम्‍पल मेल (Mumbai Central)
पश्चिम एक्‍सप्रेस (Bandra Terminus)
अमरावति एक्‍सप्रेस (Bandra Terminus)
अवध एक्‍सप्रेस (Bandra Terminus)
महाराष्‍ट्र संपर्क क्रांति एक्‍सप्रेस (Bandra Terminus)

आरोग्यविषयक वृत्त