खूशखबर… इन्शूरन्स क्लेमसाठी आता खेटे घालायची गरज नाही

मुंबई : वृत्तसंस्था – कोणत्याही विम्याचे हप्ते वेळच्या वेळी घेणाऱ्या, उशिरा हप्ता भरल्यास दंड आकारणाऱ्या विमा कंपन्या विम्याचे दावे निकाली काढताना खेटे घालायला लावतात. असा अनुभव अनेकांना आला असले. मात्र आता जुलैपासून आपली फेऱ्यातून सुटका होणार आहे. विमा नियामक प्राधिकरणाने (IRDA) या संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विमाधकर किंवा त्यांच्या वारसांना इन्शूरन्स क्लेमवर सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती पत्र, फोन, मोबाईल किंवा ई-मेलद्वारे देण्याच्या सुचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

इन्शूरन्स क्लेम केल्यानंतर संबंधीतांचा अर्ज अनेक टप्प्यामधून जात असोत. हेल्थ इन्शूरन्सच्या बाबतीत बऱ्याचदा थर्ड पार्टी कंपनीकेडे जावे लागते. काही कंपन्या विमाधारकांना व्यवस्थित सेवा देतात. मात्र, बऱ्याचदा आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी विमा कंपन्यांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने पारदर्शी धोरण राबवण्याचे निर्देश विमा नियामक प्राधिकरणाने (IRDA) दिले आहेत. विमाधारकाला किंवा त्याच्या वारसाला आपला दावा कोणत्या स्टेजला आहे याची तपशीलवार माहिती समजण्याची व्यवस्था करण्यास IRDA ने सांगितले आहे.

क्लेमचा अर्ज आल्यानंतर एक रेफरन्स नंबर तयार केला जाईल. विमाधरकाचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्या नंबरशी जोडलेला असले. तुमचा क्लेमचा अर्ज पुढे सरकेल, त्यासंबंधीची माहिती विमाधारकाला कळवली जाणार आहे. विम्याचा क्लेम मंजूर झालाय की नामंजूर त्याचे पैसे धनादेशाने दिले जाणार की थेट बँकेत जमा होणार इथपर्य़ंतची माहीती कंपनी विमाधारकला किंवा वारसाला कळवणार आहे. समजा, एखाद्या ग्राहकाला आपला क्लेम कुठल्या टप्प्यावर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तो रेफरन्स नंबरच्या आधारे वेबसाईटवरून माहिती घेऊ शकेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like