खुशखबर ! आता जमिनीचा ७/१२ नव्या ढंगात, नव्या रूपात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – जमीन खरेदी प्रकरणात अनेकदा फसवणूक आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुढे अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी सरकार लवकरच सातबाराचं नवं अद्ययावत रुप आणणार आहे. सरकार अद्ययावत लँड टायटल सर्टिफिकेट देणार आहे.

यामुळे सरकारकडे सगळ्या वादविवादीत प्रकरणांची सरकारकडे नोंद होणार आहे. यामुळे सुरु असलेले सर्व वाद-विवाद, खटले-तंटे, सुनावणी, जप्ती प्रकरणांची एकाच दस्तऐवजावर नोंद होणार आहे. यासाठी सरकार लवकरच विधिमंडळात जमीन मालकी हक्क अधिनियम विधेयक मांडलं जाणार आहे.

यासाठी सरकारने जमाबंदी आयुक्त चोकीलिंगम यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात अली होती. या समितीने काल आपला अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवल्यानंतर आता त्यांच्या परवानगीनंतर तो विधिमंडळात ठेवला जाणार आहे. जर विधिमंडळात हे विधेयक मंजूर झाले तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

या कायद्याची अंमलबजावणी आधी बृहन्मुंबई क्षेत्रात नंतर एमआयडीसी क्षेत्र किंवा इतर महापालिका क्षेत्रांमध्ये होईल. त्यापुढे त्याची व्यवहार्यता तपासून सर्वसामान्यांच्या जमिनींचा यामध्ये समावेश होईल.

सध्या सातबाऱ्यावर या तपशिलाची असते नोंद

१)सातबारा उताऱ्यावर महसूल खात्याच्या जमीन नोंदवहीतील तपशील असतात.
२)जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर
३)त्यामध्ये जमिनीच्या मालकाचं किंवा ती जमीन कसणाऱ्याचं नाव
४)जमिनीचं क्षेत्र
५)पोटखराब क्षेत्र म्हणजेच लागवडीयोग्य नसलेलं क्षेत्र
६)जिरायत अथवा बागायत याचा तपशील
७)मागील हंगामात घेतलेल्या पिकांचा तपशील
८)शेतकऱ्याने त्या जमिनीवर घेतलेल्या कर्जाचा तपशील
९)कोणत्या बँकेचं किती कर्ज, गहाणखत कोणाच्या नावावर याचा तपशील
त्यामुळे आता जमीन खरेदी करताना किंवा विकताना जर त्यावर कर्ज असेल किंवा त्या जमिनीवर कोणत्या प्रकारचा खटला आहे कि नाही याची देखील माहिती मिळेल आणि यामुळे नागरिकांची होणारी फसवणूक टाळता येईल.

आरोग्य विषयक वृत्त –

लग्‍न झाल्यानंतर पतीसोबत देवदर्शनाला आलेली ‘नववधू’ प्रियकरासोबत ‘पळाली’

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय