खुशखबर ! आता INTERNET शिवायही पैसे ट्रान्सफर करता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दैनंदिन व्यवहारांमध्ये रोख रकमेपेक्षा नागरिकांचा डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहारांवर भर वाढला आहे. मोबाइलच्या साह्याने पेमेंट करण्याला ग्राहकांकडून वाढती पसंती मिळत आहे. ‘डिजिटल पेमेंट ॲप’ वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते. मात्र आता इंटरनेट कनेक्शनशिवायही पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. त्यासाठी BHIM App आणि यूएसएसडी (USSD) आधारित मोबाईल बँकिंग वापरणे आवश्यक आहे.

असे करा इंटरनेट कनेक्शनशिवायही पैसे ट्रान्सफर –

स्मार्टफोनमध्ये BHIM APP मध्ये डाउनलोड करा. त्यावर रेजिस्ट्रेशन करा. मोबाईल नंबर बँक खात्याशी कनेक्ट करा.
इंटरनेट उपलब्ध नसताना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूएसएसडी (USSD) आधारवर मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडा. *99# डायल करा.
त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर पैसे पाठवा(Senod Money), पैसे मागवा(Request Money), चेक बॅलन्स(Check Balance), माझे प्रोफाइल(My Profile), प्रलंबित विनंती(Pending Requests, व्यवहार(Transaction) आणि यूपीआय(UPI) पिन हे सात पर्याय येतील.
यातील आवश्यक पर्याय निवडून निवडल्यानंतर मोबाईल नंबर, पेमेंट पत्ता, सेव्हिंग बेनिफिट किंवा आयएफएससी(IFSC) कोड ही माहिती भरा आणि अकाउंट नंबरच्या सहाय्याने पैसे ट्रान्सफर करा.