Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google एक पॉप्युलर सर्च इंजिन आहे. याचा वापर जवळपास सर्व इंटरनेट यूजर्स करतात. लोक प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गुगल करतात. Google सुद्धा क्षणात सर्व प्रश्नांची उत्तरे देते. परंतु, तुम्हाला हे माहित नसेल की, काही अशा गोष्टी सुद्धा आहेत, ज्या गुगलवर सर्च केल्यास जेलची हवा खावी लागू शकते.

 

1. फिल्म पायरेसी (Film Piracy) :
फिल्म लाँच होण्यापूर्वी लीक करणे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. अशाच प्रकारे पायरेटेड फिल्म डाऊनलोड करणे सुद्धा गुन्हा मानला जातो. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

 

2. बॉम्ब बनवण्याची पद्धत (Method of Making Bomb) :
Google वर गंमतीने सुद्धा बॉम्ब बनवण्याची पद्धत सर्च केल्यास जेलची हवा खावी लागू शकते. बॉम्ब बनवण्याची पद्धत शोधणे किंवा अशाप्रकारच्या इतर गोष्टीचा सर्च करणे गुन्हा आहे आणि याची शिक्षा मिळू शकते. अशा अ‍ॅक्टिव्हिटीवर सायबर सेलचे लक्ष असते आणि तुमच्या डिटेल सुरक्षा एजन्सीजपर्यंत पोहचू शकतात.

3. गर्भपात करण्याची पद्धत शोधणे (Finding a way to have an abortion)
गुगलवर जर अबॉर्शन करण्याची पद्धत शोधली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण, भारतीय कायद्यानुसार, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. यामुळे तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता.

 

4. प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक करणे (Leaking private photos and videos)
गुगल किंवा एखाद्या सोशल मीडिया साईटवर प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक करणे गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येते.
यासाठी तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावे लागू शकते. अशावेळी चुकूनही एखादा प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवर शेयर करू नका.

 

5. चाईल्ड पॉर्न (Child porn)
भारत सरकार (Indian Government) चाईल्ड पॉर्नोग्राफी बाबत खुप कठोर आहे.
गुगल चाईल्ड पॉर्न सर्च करणे, पाहणे किंवा डाऊनलोड गुन्हा आहे. हे काम केल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

 

Web Title :- Google | searching these things on google will take you to the jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पार्टीसाठी टोळक्याने कोयताचा धाक दाखवून लुटले; सिंहगड रोड पोलिसांकडून 6 सराईत गुन्हेगारांना अटक

Omicron Variant Symptoms | सर्दी-ताप आल्यास नका करू दुर्लक्ष; ‘हे’ आहेत ओमायक्रॉनची 2 भिन्न लक्षणे, जाणून घ्या

Pune Crime | तलाठ्याला मारहाण अन् तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या चालकाला शिवीगाळ