Pune Crime | तलाठ्याला मारहाण अन् तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या चालकाला शिवीगाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-सोलापूर रोडवर (Pune Solapur Highway) बेकायदेशीरपणे वाळू (Sand) वाहतूक करणारे दोन ट्रॅक जप्त करुन ते खडकमाळ (Khadakmal) येथे घेऊन जात असताना ८ ते १० जणांच्या जमावाने अपघाताचा बनाव करुन तलाठ्याला (Talathi) लाकडी दांडक्याने मारहाण केली. तहसिलदार तृप्ती कोलते पाटील (Trupti Kolte Patil Tahsildar) यांच्या कार चालकाला शिवीगाळ करुन जप्त केलेला ट्रक (Truck) पळवून नेला. हा प्रकार पुणे सोलापूर रोडवरील शेवाळवाडी (Shewalewadi) येथील रुकारी पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

याप्रकरणी तलाठी राजेश ज्ञानदेव दिवटे (Talathi Rajesh Dnyandev Divate) (वय ३०, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. तहसिलदार तृप्ती कोलते व राजेश दिवटे यांनी दोन वाळूचे ट्रकवर कारवाई केली. त्यानंतर हे ट्रक खडकमाळ आळी येथील हवेली तहसिल कार्यालयात (Haveli Tehsil Office) घेऊन जात असताना ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यातील एक ट्रक अडविला. आमच्या गाडीला घासला आहे, असा बनाव करुन तलाठी दिवटे यांच्याशी वाद घातला.

त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण (Pune Crime) केले. तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या गाडीच्या चालकाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. त्यातील एक ट्रक वाळुसह चोरुन नेला. दुसर्‍या ट्रकवरील चालक ट्रक सोडून पळून गेला. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) ८ ते १० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शेळके (PSI Shelke) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Talathi beaten up, Haveli Tehsildar Trupti Kolte Patil’s driver insulted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Variant | चिंतेत भर! राज्यात आणखी 20 ओमिक्रॉन रुग्णांची भर, पुण्यातील 6 रुग्णांचा समावेश

 

Bombay High Court | डीएसके यांचे जावई केदार वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1410 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 65 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | 12 लाख पेन्शनधारकांसाठी ‘इथं’ वाढला DR, परंतु यांना होणार नाही लागू