Gopichand Padalkar | ‘शरद पवारांनी राहुल गांधींची जी अवस्था केली, तशीच संजय राऊतांना आदित्य ठाकरेंची करायचीय’ – गोपीचंद पडळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार आरोप केला आहे. ”उत्तर प्रदेश आणि गोव्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (Shiv Sena) नोटा पेक्षा कमी मतं मिळाली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा फज्जा उडवण्यात संजय राऊत यशस्वी ठरले आहेत. यापूर्वी ‘काकांनी’ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जशी टोपणनावं मिळवून दिली, तशीच अवस्था आदित्य ठाकरे यांचीही व्हावी, अशी संजय राऊत यांची सुप्त इच्छा आहे.” असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले की, ”जम्मूच्या लाल चौकात अतिरेक्यांनी ‘तिरंगा फडकावूनच दाखवावाच’, अशी धमकी दिली होती. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी लाल चौकात जाऊन तिरंगा फडकावला होता,” असं ते म्हणाले. तसेच, ‘विधानसभेत उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतरही ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापली जातेय. सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे. जनाब राऊत यांनी यावरही अग्रलेख लिहून दाखवावा.’

 

पुढे पडळकर म्हणाले, ”संजय राऊत वाय दर्जाच्या सुरक्षेवर अग्रलेख लिहतात.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याप्रमाणे महाराष्ट्रात सुरक्षा विना फिरून दाखवावं.
म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.”

दरम्यान, गेल्या काही दिवसाआधी पडळकर यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली होती.
महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) सत्ता वाचवण्यासाठी शरद पवारांना वारंवार त्यांच्याच पक्षातील आमदारांना पक्षात राहण्याच्या विनवण्या कराव्या लागताहेत.
राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला मोठे नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांना मागील तीस वर्षांमध्ये राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवता आला नाही.
जनतेच्या पाठबळावर सत्तेत येणार नसल्याची खात्री असल्यामुळेच त्यांच्याकडून सत्ता वाचवण्याची धडपड सुरू आहे.
असं पडळकर यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Gopichand Padalkar | Shivsena leader sanjay raut wants to bring aaditya thackeray in situation like rahul gandhi says bjp gopichand padalkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा