योगींचं गोरखपूर जिंकणारा खासदार योगींच्याच गोटात

बसपा-सपा युतीला भाजपचा जोरदार धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदार संघातून विजय मिळवत भाजपला धोबीपछाड देणारे बसपा-सपा युतीचे खासदार प्रविण निषाद हे योगींच्याच गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे बसपा-सपा युतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. निषाद यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

प्रविण निषाद यांनी भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे नेते जे.पी. नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. प्रविण निषाद हे निषाद पक्षाचे चेअरमन संजय निषाद यांचे चिरंजीव आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून निषाद यांनी विजय मिळवला होता. हा मतदारसंघ योगी यांचा गड मानला जात होता. योगी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, बसपा-सपा व निषाद पार्टीने युती करत या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली होती.

गोरखपूरमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रविण निषाद यांनी बसपच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे बसपा-सपाला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात निषाद समाजाचे वर्चस्व असून हा समाज महत्वाचा मानला जातो. आता तिकीट कुणाला दिले जाणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like