लालबागचा राजा मंडळावर सरकारी अंकुश

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन 
मुंबईतील लालबागचा राजा गणपतीची मोठी प्रसिद्धी आहे. नवसाला पावणारा राजा अशी त्याची ख्याती आहे. दरवर्षी या राजाचे दर्शन घेण्याकरिता मोठी गर्दी उसळते. पण तेथील मंडळाचे कार्यकर्ते मुजोरी करताना ,तसेच व्हीव्हीआयपींची अरेरावी करताना दिसले होते. त्यामुळे राजाच्या दर्शनाच्या आशेने येणाऱ्या भाविकांची परवड होत होती. त्यामुळेच आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारी लेअंकुश लागणार आहे.धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f0e100d-d074-11e8-bfa4-2b14b04879a2′]
या निर्णयामुळे लालबागच्या राजावर आता सरकारची नजर असणार आहे. पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. तसंच लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. भाविकांच्या रांगा कशा असाव्यात, कोणाला अग्रक्रम मिळावा किंवा मिळू नये आदी सर्व बाबींवरती धर्मादाय आयुक्तांच्या समितीची नजर राहणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या मुजोर वागणुकीला चाप बसेल अशी अपेक्षा आहे.
 [amazon_link asins=’8184518218,B01MCUTU9K,935089940X,9387779319′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c969241-d074-11e8-8f3c-21d55bdb0e42′]