वाहनांच्या किंमती लवकरच होणार कमी ; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी वाहन उद्योगावरील जीएसटी दर येत्या काळात कमी करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या वाहन उद्योगावर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. १ एप्रिल २०२० पासून लागू झालेल्या बीएस-VI च्या मानकानुसार गाड्यांची निर्मिती करण्याकडे लक्ष्य दिल्यामुळे सध्या वाहन उद्योग क्षेत्र एका संक्रमण अवस्थेतून वाटचाल करत आहे. सीतारामन म्हणल्या की, हा काही केंद्र सरकारचा निर्णय नव्हता तर तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता. त्यामुळेच वाहन उद्योग कंपन्या ३१ मार्च २०२० नंतर बीएस-IV इंजिन असलेले वाहन निर्माण करू शकणार नाहीत. मग ते एखादे स्कुटर असेल किंवा वाहन. वित्त मंत्री म्हणाल्या की, सरकारने जिएसटी कौंसिलला वाहन उद्योगावरील जीएसटी दर कमी करण्यास सुचवले आहे.

वाहन उद्योगाला भरारी देण्यासाठी पावले उचलली जात आहेत
सरकार वेगवेगळ्या विभागांशी चर्चा-विमर्श करत असून बाजारातील विविध घटकांकडून आम्ही माहिती घेत आहोत. वाहन उद्योगाला चालना मिळण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जात आहेत जेणे करून वाहनाच्या मागणीमध्ये वाढ होईल. सध्या नौकऱ्या जात आहेत. यावर प्रश्न विचारला असता सीतारमन म्हणाल्या की, सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध हा असंगठित क्षेत्रात होत असतो जायची आणखीही व्यवस्थित नोंदणी नाही. इलेट्रीक वाहनाच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणल्या की, आम्हला सर्व प्रकाच्या वाहनाचा मार्केट मध्ये हिस्सा हवा आहे.सध्या सरकार वाहन खरेदी करताना करामध्ये सूट देत आहे.

सरकारी विभागातील वाहन खरेदीवरील स्थगिती हटवली
सरकारी विभागात वाहन खरेदी करण्यास घातलेली बंदी आता उठवली जात आहे. ज्यामुळे वाहन खरेदीला चालना मिळू शकेल. तसेच सरकारच्या गोधळल्या स्क्रॅपिंग पॉलीसी चा पुनर्विचार करत आहे. सरकार जून २०२० पासून नवीन वाहनाच्या एक वेळ भराव्या लागणारी फी वर स्थगिती आणणार आहे.

बाजारात सर्व प्रकारच्या वाहनाचा वाट असावा
सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि सर्व नवीन तरतुदी वाहन उद्योग क्षेत्राला मंदीच्या सावटातून बाहेर पडण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावतील. तसेच अर्थमंत्र्यांनी सध्याची स्थिती आर्थिक मंदीची असल्याचे स्पष्ट असे संकेत दिले नाहीत आणि ते फेटाळले सुद्धा नाहीत. आम्हाला सर्व प्रकारच्या वाहनांचा बाजारात वाटा हवा आहे. कोणत्याही एका प्रकाच्या वाहनांना आम्ही पाठिंबा देत नाही असे अर्थमंत्री म्हणल्या.

आरोग्यविषयक वृत्त