Government of Maharashtra | राज्य सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात; वेतन 20 हजार

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Government of Maharashtra | राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) मोठा निर्णय घेतला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची (Retired Teachers) कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी जीआर काढला आहे.

7 जुलै रोजी यासंदर्भात सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद शाळांत पुढील 15 दिवसांमध्ये कंत्राटीपद्धतीने भरती (Contract Teacher Recruitment) केली जावी, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांना 20 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. जिल्हा परिषद शाळामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने (Government of Maharashtra) घेतलेल्या या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवृत्त असणारे कमाल 70 वर्षांचे शिक्षक का घेतले जात आहेत? नवीन तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या शिक्षकांना संधी का नाही? यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष ठेवली आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Zilla Parishad CEO) यांनी पात्र
आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया आयुक्तांच्या नियंत्रणात असणार आहे. कंत्राटी शिक्षकांना नियुक्त करताना शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करावा लागणार आहे.

Web Title :   Government of Maharashtra | state government reappoints retired teachers to fill vacancies in zp school

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Uddhav Thackeray | ‘माझा ‘कलंक’ शब्द एवढा प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले-‘मी जे म्हटलं ते योग्यच!’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘मातोश्री’ची दारं खुली आहेत का?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… (व्हिडिओ)