जम्मू काश्मीरमध्ये आज सुरु होणार सरकारी कार्यालये ; फोन सेवा सुरु करण्याचा होणार निर्णय

श्रीनगर : वृत्तसंस्था – स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडल्यानंतर आता शुक्रवारपासून जम्मू काश्मीरमधील सरकारी कार्यालये सुरु होणार असून काश्मीर घाटीतील फोन सेवा पूर्ववत करण्याविषयीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने ३७० कलम हटविल्याच्या अगोदर काश्मीरमध्ये जमावबंदी आदेश लागू केला होता. त्याचवेळी मोबाईल सेवाही बंद केली होती.

राज्यपाल सत्यपाल मलिकने गुरुवारी सायंकाळी सुरक्षा स्थितीची माहिती घेऊन सरकारी कार्यालये व अन्य कार्यालये सुरु करण्याचे आदेश दिले. आज जुम्मे की नमाजच्या दरम्यान सुरक्षेची समिक्षा केली जाईल. त्यानंतर सर्वसामान्य लोकांवरील प्रतिबंध मागे घेण्याचा विचार करण्यात येणार आहे.

तसेच काश्मीर घाटीत मोबाईल सेवा सुरु करण्याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या पाच दिवसात काश्मीर घाटीत कोणतीही हिंसक घटना घडलेली नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. गेल्या काही वर्षांमधील यंदा प्रथमच स्वातंत्र्य दिन काश्मीर घाटीत संपूर्ण शांतता होती. अमरनाथ यात्रेचा गुरुवारी अनौपचारिक समारोप करण्यात आला. यंदा ३० दिवसाच्या कमी कालावधीत ३ लाख ३० हजार भाविकांनी पवित्र अमरनाथ गुहेत जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like