Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या योजनांच्या गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी, 30 जूनला सरकार देणार मोठी खुशखबर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC यासह सर्व लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. जवळपास दोन वर्षांनंतर सरकार 30 जून रोजी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Government Schemes)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करून 4.90 टक्के केली आहे. यापुढे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याची तयारी सुरू आहे. आरबीआयनंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
अशा स्थितीत देशभरातील छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनाही सरकार खुशखबर देऊ शकते. सरकार 30 जून रोजी अल्पबचत योजनेवरील व्याजदरांचा आढावा घेणार आहे. यामध्ये व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
सध्या व्याजदर खालच्या पातळीवर
कोरोनामुळे गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या ठेवींवर खूपच कमी व्याज मिळत आहे. बँका बचत खात्यावर 2.5% ते 3% व्याज देत आहेत.
त्याच वेळी, एक ते तीन वर्षांची एफडी 5.5%, पाच वर्षांची एफडी 6.7% आणि पाच वर्षांच्या आरडीवर 5.8% व्याज मिळत आहे.
पोस्ट ऑफिसमधील ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.4% दराने व्याज मिळत आहे. सध्या, गुंतवणूकदारांना PPF 7.1%, किसान विकास पत्र 6.9% आणि सुकन्या समृद्धी योजना 7.6% दराने व्याज मिळत आहे. (Government Schemes)
बचतीवर व्याज वाढवण्याची गरज
यावेळी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी बचतीवरील व्याज वाढवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनानंतर घटलेल्या उत्पन्नात गगनाला भिडलेल्या महागाईने ग्राहक हैराण झाले आहेत.
अशावेळी छोट्या बचत योजनांवरील व्याज वाढवण्याचा निर्णय हे एक चांगले पाऊल ठरू शकते.
यामुळे लहान बचत योजनांमध्ये बँकांमधील ठेवी वाढतील. यामुळे लिक्विडीटी वाढेल आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
Web Title :- Government Schemes | ppf sukanya samriddhi and nsc schemes good news for the investors on june 30 the government will give great news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update