शासनाने नुकसानग्रस्तांना ‘कोल्हापूर पॅटर्न’ पद्धतीने मदत द्यावी : देवेंद्र फडणवीस

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान भरपाईची जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी आता त्यांचे कार्यकाळात पुर्ण करून महाराष्ट्रातील जनतेच्या व शेतकर्‍यांच्या आपेक्षा पूर्ण कराव्यात. मागील वर्षी आम्ही दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकर्‍यांना जाहीर केले होते.त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सदर पॅकेज कमी असुन 25 ते 50 हजार रुपये दर हेक्टरी मदतीची मागणी केली होती. आता उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री असल्याने त्यांनी मागील वर्षीची मागणी यावर्षी पुर्ण करावी व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे मदत जाहीर करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे पत्रकार परीषदेत बोलताना केली.

देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी १० वाजता पूणे जिल्ह्यातील दौंड तालुका व इंदापूर तालुक्यात अतिवृृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकर्‍यांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवाण दरेकर, माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजित निंबाळकर,दौंडचे आमदार राहुल कुल, राम सातपुते, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील, इंदापूर कृृृषा उत्पन्न बाजार समीतीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, भाजप पूणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, निरा भीमाचे संचालक राजवर्धन पाटील, भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

देवेंद्र फडणविस यांनी हर्षवर्धन पाटील यांचेसोबत सोमवारी दुपारी 12:30 वा. चे. सुमारास भिगवण, भादलवाडी, सणसर, निमगाव केतकी भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली. इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने शेती, घराचे, दुकानाचे ऐतिहासिक तलावाचे नुकसान झाले असून त्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडल्याने मोठी हानी झाली असुन या सामान्य नागरिकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी, यासाठी देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदन दिले. फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची जी घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना आम्ही जो कोल्हापूर पॅटर्न दिला होता त्याप्रमाणे मदत झाली पाहिजे. ज्यामध्ये आम्ही जवळजवळ अडीच ते तीन लाखाची मदत केली होती. त्या पॅटर्नप्रमाणे ही मदत त्यांना मिळावी असे देवेंद्र फडनविस म्हणाले.