ऑनलाइन भरती परिक्षेची बदलून जाणार ‘रूपरेखा’, सरकार करतंय अशी काही खास तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी पदांसाठी परीक्षा अधिक पारदर्शक व सुरक्षित ठेवण्याची आता तयारी सुरू आहे. म्हणूनच सरकार एक अँटी चीटिंग टूल तयार करण्याच्या विचारात आहे, ज्याचा उपयोग ऑनलाईन सामान्य पात्रता परिक्षा (सीईटी) मध्ये केंद्र सरकारच्या नोकर भरतीसाठी केला जाईल.
अधिकाऱ्यांच्या मते, हे एनक्रिप्शन आणि जंबल‍िंग दोन्ही सुरक्षित करेल. एन्क्रिप्शनद्वारे डेटा कोडमध्ये रूपांतरित केला जातो आणि जंबल‍िंग मध्ये प्रश्नांना एकत्र केले जाते. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की सीईटी फसवणूक करणार्‍यांना चकवा देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

उमेदवारांना याची जाणीव होईल की भिंती व खिडक्या चढून काही मिळणार नाही. बिहारमधील एका शाळेतील व्हायरल व्हिडीओ संदर्भात ते म्हणाले, ज्यात परीक्षा केंद्राच्या भिंतीवर छेडछाड करीत आणि खिडकीतून चिट पास करणे, हे आता शक्य होणार नाही.

कार्मिक विभागाचे सचिव सी. चंद्रमौली यांच्या म्हणण्यानुसार, हे साधन ऑनलाइन परीक्षा प्रश्नपत्रिका कॉपी / फसवणूक किंवा लीक होण्यापासून संपूर्ण संरक्षण प्रदान करेल. हे अल्गोरिदम सुनिश्चित करेल की प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका प्राप्त होतील आणि प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची संख्या ही मिळतीजुळती असेल.

सीईटी राष्ट्रीय भरती एजन्सीमार्फत घेण्यात यावी असा प्रस्ताव आहे. नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी, एनआरए ही एक सार्वत्रिक संस्था आहे जी गट ब आणि सी पदांसाठी प्रवेश स्तरीय परीक्षा घेते. यात स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांचा समावेश आहे.

सिंह म्हणाले की भरती एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचे गुण तीन वर्षांसाठी वैध असतील. यासह, राजपत्रीत पदांव्यतिरीक्त अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही आणि यामुळे भरती परीक्षा घेण्यास लागणारा वेळ आणि खर्च वाचेल. चंद्रमौली म्हणाले की सीईटी सुरू झाल्यानंतर भरती प्रक्रियेत लागणारा कालावधी 12-18 महिन्यांवरून कमी करुन 3-4 महिने करण्यात येईल. परीक्षा घेण्यापासून ते पोस्टिंगपर्यंतची प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल.

सध्या साधारणत: १.२५ लाख नोकरदारांसाठी दरवर्षी वेगवेगळ्या एजन्सीद्वारे घेतलेल्या भरती परीक्षेसाठी सुमारे २.५ कोटी उमेदवार अर्ज करतात किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like