Gravittus Foundation | सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई आढाव यांना ग्रॅव्हिटस फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gravittus Foundation | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे देण्यात येणार पहिला जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका शीलाताई आढाव (Sheelatai Adhav) यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात (S M Joshi Socialist Foundation Hall) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. (Gravittus Foundation)

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे (Dr. Sadanand More) यांच्या हस्ते हा पुरस्कार शीलाताईंना प्रदान केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ लेखिका व पत्रकार प्रतिमा जोशी (Journalist Pratima Joshi) शीलाताईंची प्रकट मुलाखत घेणार आहेत. महाराष्ट्रातील समता चळवळींचे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार (Vasudha Sardar) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत डॉ. बाबा आढाव यांची सहचारिणी म्हणून तितकेच महत्वाचे योगदान शीलाताईंनी दिले आहे. तसेच त्या एक उत्तम परिचारिका, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे, असे ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे (Usha Kakade)यांनी नमूद केले.

Web Title : Gravittus Foundation | Gravitus Foundation Lifetime Achievement Award announced to social activist Sheilatai Adhav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMRDA – Property Cards | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच संपूर्ण करणार – शंभुराज देसाई

Annasaheb Patil Mahamandal | आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत – नरेंद्र पाटील

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्र साठा जप्त! दोन डिलरसह सात सराईत गुन्हेगारांना अटक, 17 गावठी पिस्टल, 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार

Eknath Khadse | राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेवर मोठी जबाबदारी

Ramdas Kadam | रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीने घेतले ताब्यात

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे

Kushal Badrike | कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला “नात्यांची, स्वप्नांची नुसती राख…”