काय सांगताय ! होय, ‘हे’ आजोबा वयाच्या 93 व्या वर्षी झाले ‘मास्टर्स’, आता तयारी ‘एमफिल’ची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. शिक्षणाला कोणतंही वय नसतं, असं यशस्वी व्यक्तींचं म्हणणं आहे. याचेच उदाहरण इग्नूच्या (Indira Gandhi National Open University – IGNOU) दीक्षांत सोहळ्यात पाहायला मिळालं. शिवा यांनी पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये (public administration) मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी सीआई शिवासुब्रमण्यम यांनी आपले मास्टर्सची डिग्री पूर्ण केली.

या दीक्षांत सोहळ्यात एचआरडी मंत्री रमेश पोखरियालदेखील उपस्थित होते. त्यांनी शिवा यांना 93 वर्षांचा ‘तरुण’ म्हणत त्यांचे कौतुक केले. या दीक्षांत सोहळ्यातील ते सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी होते. त्यांना शिकण्याची खूप आवड होती, पण आई – वडील आजारी असल्याने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. नंतर ते नोकरी करू लागले. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये त्यांनी क्लर्कची नोकरी केली. ५८ व्या वर्षी संचालक पदावरून निवृत्त झाले.

मात्र त्यांची अजून हि शिक्षण घेण्याची इच्छा होती. कुटुंबाची जबाबदारी असल्याने शिक्षण घेता येत नव्हते. त्यादरम्यान इग्नूमध्ये शिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादा नाही. असे त्यांना समजले. शिवा यांच्या फिजियोथेरेपिस्टने इग्नूमध्ये कोर्स करणार असल्याचे सांगितले. त्यांनी डॉक्टरांना अभ्यासक्रमांविषयी विचारपूस करण्यास सांगितली. नंतर शेवटी त्यांनी पदवीच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. त्यांच्या नातवाचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिवा येथे थांबणार नाहीत त्यांना एमफिल (mphil) करण्याची इच्छा आहे, असे त्याच्या मुलीने सांगितले आहे. ‘मला माहित नाही हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मी जिवंत राहिल की नाही’, असे शिवा म्हणाले. एमफीलमध्ये खूप कमी जागा असतात. अशापरिस्थिती ते अन्य कोणाची तरी सीट कमी करतील. सध्या ते कमी वेळेत पूर्ण होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या शोधात आहेत.