गणेशोत्सवात नारळाच्या मागणीत पाचपट वाढ, आवकही वाढली, भाव स्थिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणेशोत्सवात नारळाला खुपच महत्त्व असल्याने नारळाच्या मागणीत पाचपटीने वाढ झाली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डमधील भुसार बाजारात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून नारळाची मोठी आवक होत आहे. तसेच उत्पादन चांगले झाले असल्याने दरही स्थिर आहेत.

[amazon_link asins=’B00BSE5WQ4,B00MIFIKO8,B00MIFIYVM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ab3c0cb-b8b1-11e8-8ceb-45aa15e92a79′]

भाविकांकडून उत्सवाच्या काळात नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळाला दुकानदारांसह हॉटेल व्यावसायिक, खानावळचालकांकडूनही मोठी मागणी असते. गणेशोत्सवात बाहेरगावाहून मोठय़ा संख्येने भाविक पुण्यात येतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून नारळाला मोठी मागणी असते.गणेशोत्सवात उकडीचे मोदक गणरायाला प्रसाद म्हणून अर्पण केले जातात. या मोदकांसाठी नारळाचा वापर केला जातो. घरोघरी हे मोदक उत्सवाच्या काळात तयार केले जातात.

[amazon_link asins=’B07BCGC13F,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e1f494c-b8b2-11e8-83d2-bf8109a81454′]

गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोल वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

अलिकडे उकडीचे मोदक विक्रिसाठी बनविणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परिणामी नारळांची मागणीही वाढली आहे. नारळाच्या मागणीत वाढ झाली असली तरी बाजारात नारळांचा तुटवडा नाही. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत अठरा ते पस्तीस रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारात घाऊक शेकडा नारळाचे भाव मद्रास नारळ  २५०० ते २७०० रुपये, नवा नारळ १२०० ते १३००, आंध्र प्रदेश पालकोल- १४०० ते १६००, कर्नाटक सापसोल १६०० ते २२०० असे आहेत.