GST | केंद्राकडून सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी दही, लस्सी वरील GST मागे, निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधीच देशात महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना केंद्र सरकारने (Central Government) ज्या गोष्टी जीएसटीच्या (GST) कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली होती. तसेच ज्या वस्तूंवर आधीच जीएसटी (GST) होता, त्यामध्ये वाढ केली. यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) विरोधी पक्षांनी गदारोळ माजविला आहे. केंद्राने जीएसटी लावण्याच्या निर्णय घेतल्याने जनतेत प्रचंड रोष निर्माण होत आहे. असे असताना अखेर केंद्र सरकारने माघार घेतली आहे.

केंद्र सरकारने सुट्या धान्यावर (Grain) देखील पाच टक्के जीएसटी (GST) आकराला होता. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी ट्विट करुन हा जीएसटी मागे घेत असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी दही, लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

मागील महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत (GST Council Meeting) ज्या वस्तू जीएसटीच्या कक्षेत नाहीत त्या जीएसटीच्या कक्षेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
25 किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आला होता.
याची अंमलबजावणी 18 जुलैपासून झाली होती. अनेक वस्तूंचा जीएसटी देखील वाढविण्यात आला आहे.
त्यामुळे अनेक वस्तू, खाद्यपदर्थ महाग झाले आहेत. मात्र आता केंद्राने खुल्या धान्यावरील जीएसटी मागे घेऊन दिलासा दिला आहे.

 

Web Title :- GST | modi government withdraws gst on open cereals aata wheat curd lassi announcement by nirmala sitharaman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)