चौकीदाराचा मुलगा निघाला ‘कॉपीबहाद्दर’ ; भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले ट्रोल

गांधीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतून वाघानी यांच्या मुलाला परिक्षेत कॉपी करताना पकडण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे ‘चौकीदार’ लावतात. त्यामुळे चौकीदाराचा मुलगा निघाला कॉपीबहाद्दर असे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. आता या चौकीदाराच्या मुलावर विद्यापीठ काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाघानी यांचा मुलगा मीत वाघानी हा भावनगरमधील एम. जे. सी. सी. महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशनची (बीसीए) परीक्षा देणाऱ्या मीत याच्याकडे २७ चिठ्ठ्या सापडल्या. त्यामध्ये परीक्षेत विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे होती. त्याच्याबरोबर अन्य तीन विद्यार्थ्यांनाही कॉपी करताना पकडण्यात आले.

याबाबत भावनगर कॉलेजचे प्राचार्य वाटलिया यांनी सांगितले की, आम्ही चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. यामध्ये गुजरात भाजपा अध्यक्ष जीतू वाघानी यांचा मुलगा कोण आहे, याची माहिती आमच्याकडे नाही. या मुलांवर योग्य ती कारवाई होईल.
वाघानी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मीतला परिक्षेत कॉपी करताना पकडण्यात आले. त्यावर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल.

Loading...
You might also like