PM kisan Samman Nidhi | 6,000 रुपये आणि इतर फायदे घेण्यासाठी या सरकारी अ‍ॅपद्वारे करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : PM kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC काऊंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. याशिवाय तुम्ही पीएम किसान निधीच्या वेबसाइटवर जाऊन सुद्धा नोंदणी करू शकता. जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर Google Play Store मध्ये जाऊन PM Kisan GoI Mobile App डाऊनलोड करू शकता.

कसे करावे रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर आधार नंबर नोंदवा आणि आपल्या राज्याचे नाव निवडा. यानंतर इमेज कोड (कॅप्चा कोड) टाका. माहिती भरण्यासाठी नाव, पत्ता, बँक अकाऊंट डिटेल, IFSC कोड एंटर करा.

यानंतर जमिनीची माहिती, जसे की, सर्व्हे नंबर इत्यादी भरा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा आणि तुमचे मोबाइल रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. याशिवाय शेतकरी कोणत्याही चौकशीसाठी पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261/011-24300606 चा वापर करूशकतात.

मोबाइल अ‍ॅपद्वारे रजिस्ट्रेशनचे लाभ

याद्वारे रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. यामध्ये तुम्ही कधीही रजिस्ट्रेशन आणि पेमेंटची स्थिती जाणून घेवू शकता. आधार नंबर अंतर्गत नावात सुधारणा करू शकता. योजनेबाबत जाणून घेवू शकता. सोबत हेल्पलाईन नंबर डायल करू शकता.

हे देखील वाचा

Supreme Court | कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला मिळणार, कारणही असेल ‘नमूद’; मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या कोणती प्रकरणे मानली जातील ‘कोविड डेथ’

SBI ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी, लवकर करा ‘हे’ कामे, अन्यथा…

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pm kisan samman nidhi register through this government app to get rs 6000 and other benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update