Gulabrao Patil | ‘आमच्या तुकड्यावर मोठा झालेला राऊत याने जास्त बोलु नये’, गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव मधील पाचोऱ्यात होत असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे (Shinde Group) नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी कोरोना काळात 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आक्रमक झाले असून त्यांनी संजय राऊतांवर सडकून टीका करत आव्हान दिलं आहे.

 

राऊतांनी अवकातीत रहावं
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, संजय राऊत यांनी अवकातीत रहावं हा आमच्या तुकड्यावर मोठा झालेला राऊत याने जास्त बोलू नये, अशी टीका करत संजय राऊत नौटंकी माणूस असून भटकलेला आत्मा असल्याचे पाटील म्हणले. सभेत संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाहीतर आमचे कार्यकर्ते सभेत घुसतील असे विधान गुलाबराव पाटील यांनी केली. यावर संजय राऊत म्हणाले सभेत घुसून दाखवा असे म्हटले.

 

संजय राऊत का हेला आहे का?
नाक खाजे आणि नकटी खिजे असा माणूस म्हणजे संजय राऊत. हा कोणत्याही गोष्टीला आपल्या अंगावर घेतो. महाराष्ट्रात हा माणूस कोणत्या माणसाची पंगा घेत नाही. कोणाला म्हणतो उंदीर आहे, बैल आहे तर संजय राऊत का हेला आहे का? अशी टोकाची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

 

मग 400 कोटीचा घोटाळा कसा?
संजय राऊतांनी केलेल्या 400 कोटी भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात 190 कोटी खर्च करावे असे शासनाचे आदेश होते. त्यापैकी 121 कोटीला मान्यता आम्ही दिली आणि 90 कोटी वितरित केले. तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च झाले. ज्या ठिकाणी तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च होत आहेत त्या ठिकाणी 400 कोटीचा घोटाळा कसा? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

तीन महिन्यात चौकशी करा
संजय राऊत माझं चॅलेंज आहे तीन महिन्यात चौकशी तुम्ही करा.
मी बाँडवर लिहून देतो चौकशीत दोषी आढळलो तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा.
उलटा चोर कोतवाल को डाटे. तुम्ही पुण्यात आणि ठाण्यात कसे व्यवहार केले आहेत हे आम्हाला माहिती आहे,
असा पलटवार पाटील यांनी केला. कावळ्याच्या शापाने कुठे गाय मरते का? तिने महिने जेलमध्ये जाणारा
संजय राऊत हा चोरटा जेलमध्ये कसा गेला?अशी टीका पाटील यांनी केली.

 

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil challenge sanjay raut over corruption allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार