Gulabrao Patil | ‘लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली’

सांगोला : पोलीसनामा ऑनलाइन Gulabrao Patil | ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, असं शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे कौतुक केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यावरही शेरेबाजी केलीय. दरम्यान त्यावेळी पाटील यांनी ED, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टिकास्त्र देखील सोडलं आहे.

त्यावेळी बोलताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता.
कोणतेही वाहन चालवायला लायसन्स लागते, हे आपल्याला माहिती आहे.
पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केले तर अजित पवार यांना कंडक्टर.
बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली.
पण, गेल्या 2 वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सोडली.

पुढे ते म्हणाले, भाजपने (BJP) निवडणुकीनंतर दगाबाजी केली.
दोन महिने आघाडीच्या आमदारांची हॉटेल ते हॉटेल अशी फिरस्ती चालू होती.
यातच पहाटेचा शपथविधी झाल्याने सगळेच चिंतेत असताना शरद पवार यांनी आपले ब्रम्हास्त्र काढले आणि मेरे गाडीने बैठ जा म्हणत पुन्हा सगळे गोळा केले.
असं ते म्हणाले. पुढे पाटील म्हणाले, आता 50 हजार सापडले की, आली ED, असे झालेय. ईडी म्हणजे आपल्या जिल्ह्यातील LCB पोलीस आहे, असा टोला लगावला.

 

दरम्यान, शिवसेनेला जेलचे काय नावीन्य, शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल, आम्ही ED ला घाबरत नाही. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
यांनी टीका करण्यापूर्वी कधी कापसाची बोन्डे,
ऊस, कपाशी, केळी कधी पाहिली का आणि आज ते शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याची टीका करीत आहेत.
अशा शब्दात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टिकास्त्र सोडलं आहे.

 

Web Title : Gulabrao Patil | Shivsena minister gulabrao patil says sharad pawar allowed unlicensed uddhav thackeray drive volvo bus directly solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयाच्या निवृत्त प्राचार्यासह चौघांवर गुन्हा दाखल; अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली उकळले 17 लाख

Crime News | संतापजनक ! गरबा पाहून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून कमावले 1600 कोटी रुपये, तुमच्याकडे आहेत का?