Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी (Silver Oak Attack Case) अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली होती. यानंतर सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना दुहेरी झटका बसला आहे. त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी (Satara Police) घेतल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. (Satara District And Sessions Court Send Gunratna Sadavarte 4 Days Police Custody)

 

साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर (Chhatrapati Family) टीका केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात (Satara District and Sessions Court) सदावर्ते यांना हजर करण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे (MSRTC Workers) वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. काल मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेतला होता. काल रात्री उशीरा त्यांना पोलीस बंदोबस्तात सातारा येथे आणण्यात आले. आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान, सिव्हर ओक हल्ल्या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात (Gamdevi Police Station) आंदोलकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 आरोपींना अटक करण्यात आली.
सदावर्ते यांच्यासह कटातील प्रमुख असलेल्या अभिषेक पाटील (Abhishek Patil), चंद्रकांत सुर्यवंशी (Chandrakant Suryavanshi) व इतर पाच जणांना गिरगाव न्यायालयाने बुधवारी पोलीस कोठडी सुनावली.
तर सदावर्ते यांच्यासह इतरांची न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी करण्यात आली.
यानंतर सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

Web Title :- Gunaratna Sadavarte | satara district and sessions court send adv gunratna sadavarte 4 days police custody

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा