मुंबईराजकीय

Kishori Pednekar | ‘त्याचं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान अन्…’;किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या गुढी पाडव्याच्या (MNS Gudi Padwa Sabha) आणि उत्तरसभेपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना त्यांनी लक्ष्य केलं. त्यासोबतच मशिदीवरील भोग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

राज ठाकरे यांनी राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती उत्साहात साजरी करा असं सागितलं.
मात्र मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी वगळता राज ठाकरे आणि मनसेचे इतर नेते चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले नसल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत पेडणेकर (Kishori Pednekar) यांना विचारल्यावर त्यांनी, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’,
अशा शब्दात टीका केली आहे.

 

आपण त्यांच्यावर जास्त लक्ष न देता कामावर लक्ष देत आहोत.
त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देणार आहोत, सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

 

दरम्यान, विरोधकांकडे टीका करणे हेच एक शस्त्र आहे.
त्यांना त्याचंं करत राहुदेत कारण उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते आपापल्या परीनं काम करत असल्याचं पेडणेकर म्हणाल्या.

 

Web Title :-  Kishori Pednekar | shivsena kishori pednekar mocks mns raj thackeray maharashtra politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Back to top button