‘गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते परंतु भाजपच्या नेत्यासारखे बोलायचे’ : गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. परंतु ते भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते अशी खोचक टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आले होते. 2 दिसवांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. खास बात अशी की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याबद्दल अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर निशाणा साधला.

अनिल देशमुख म्हणाले, “बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आपण त्यांना पहात होतो. ते असे बोलायचे की, त्यांच्या बोलण्यातून असं वाटायचं की ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत असं वाटत होतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं असं बोलणं उचित नव्हतं.”

पुढं बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “गुप्तेश्वर पांडे ज्याप्रकरे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्ये असायची त्यावरून तरी ते भाजपचे नेते आहेत असं जाणवत होतं. आता राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर विधासनसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं गेल्या काही दिवसात त्यांनी केलेल्या विधानांचा अंदाज येतो.” असंही देशमुख म्हणाले.