बस्स झाले! काँग्रेसने आमचा अधिक अंत पाहू नये

बंगळूरू : कर्नाटक वृत्तसंस्था – कर्नाटकात भाजपचे सरकार बनू नये म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी जेडीएसला पाठींबा देण्याचे ठरवले. हा निर्णय काँग्रेसच्या चांगलाच मानगुटीवर बसल्याचे चित्र सध्या कर्नाटकात पाहण्यास मिळते आहे. कर्नाटकातील सरकार म्हणजे रोज वाहणारी ताजी जखम बनल्याचे स्वरूप सध्या तेथील सत्तेला आले असून काँग्रेसाचे आमदार आता काँग्रेसच्या ताब्यात राहिले नाहीत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला देवेगौडा यांनी अल्टिमेटम दिला आहे.

नेमके काय म्हणाले देवेगौडा
आम्हाला बिनशर्त पाठींबा देत आघाडीचे सरकार बनवले. पण कुमार स्वामी यांना त्रास देण्याचा सपाटाच काँग्रेस पार्टीने लावला आहे. आत्ता पर्यंत आम्ही शांत राहिलो मात्र आता आम्ही शांत राहणार नाही. अशी धमकीच देवेगौडा म्हणाले आहेत.
सरकार चालवण्याचा हा कोणता प्रकार आहे कि ज्यात प्रत्येक दिवशी मित्र पक्षाच्या सदस्यांची मनधरणी करावी लागते आहे कि असंसदीय वक्तव्य करू नका. आता हे सगळं तुम्ही थांबवा अथवा परिणामाला तयार रहा असे देवेगौडा म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण
डिसेंबर महिन्यात कर्नाटकात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळले नाही म्हणून कुमार स्वामी यांच्यावर सैर भैर टीका करण्यास सुरु केले. यावर कढी म्हणजे भाजपने काँग्रेसचे आमदार फोडण्याचे ऑपरेशन लोटस राज्यात सुरु केले. ज्याचे धागेदोरे चक्क मुंबई पर्यंत जाऊन पोहचले. त्यानंतर ते ऑपरेशन थंड होते ना होते तो पर्यंत काँग्रेसच्या एका आमदाराने काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनाच मुख्यमंत्री म्हणून राळ उडवून दिली. या सर्व घडामोडी मुळे मुख्यमंत्री कुमार स्वामी व्यथित झाले आणि त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देईल अशी धमकीच काँग्रेसच्या आमदारांना दिली या सर्व पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.