कन्याकुमारीचे काँग्रेसचे खासदार एच. वसंतकुमार यांचं कोरोनामुळं निधन

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर फोफावला आहे. कोरोनामुळं अनेक दिग्गजांना देखील प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, काँंग्रेस पक्षाचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचं आज कोरोनामुळं निधन झाले आहे. त्यांना 10 ऑगस्टला कोरोना झाल्यानं उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

चेन्नईच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये एच. वसंतकुमार यांची अखेरचा श्वास घेतला. वसंतकुमार यांच्या निधनामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एच. वसंतकुमार यांना माननारा मोठा वर्ग कन्याकुमारीमध्ये आहे. त्यांच्यावर शोककळा पसरली आहे.