Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार, राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hadapsar Pune Crime | एकाच ठिकाणी काम करत असताना प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले. यानंतर लग्न करण्यास नकार दिली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन उत्तर प्रदेशातील तरुणावर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते मे 2023 या कालावधीत मगरपट्टा परिसरात (Magarpatta City) घडला आहे. (Rape Case Pune)

याबाबत 34 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.1) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गौरव अशोक कौशल Gaurav Ashok Kaushal (व-30 रा. सी.एच.सी, रुदौली, फैजाबाद, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत काम करत असताना आरोपीने तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने गौरव लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे अर्ज केला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तरुणीचा जबाब घेऊन गौरव कौशल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Hadapsar Pune Crime)

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग

वाघोली (Wagholi) : तक्रार केल्याच्या रागातून महिलेच्या घरासमोर येऊन अश्लील बोलून (Speaking Obscenely) विनयभंग केला (Molestation Case).
हा प्रकार येरवडा येथे मंगळवारी (दि.30) रात्री दहाच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर (Criminal On Police Record) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 46 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police) फिर्याद दिली आहे.
यावरून मजहर जुबेर खान, राझीक आयुब खान, मोहीन आयुब खान (रा. नागपूर चाळ, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल
केला आहे. आरोपी मजहर खान हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

तक्रार दिल्याचा राग मनात धरुन आरोपींनी महिलेच्या घरासमोर येऊन अश्लील बोलून विनयभंग केला.
महिलेने मुलाला बोलावून घेतल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले.
महिलेने शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता आरोपीने महिलेच्या अंगावरील कपडे ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न
होईल असे कृत्य केले. तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया