हाजी मस्तान, करीम लाला यांची इंदिरा गांधींशी ‘भेट’ व्हायची, डॉन हाजीच्या मुलाचा मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हाजी मस्तान, करीम लाला यांची इंदिरा गांधी यांंच्याशी भेट व्हायची असा खुलासा हाजी मस्तान याचा दत्तक पुत्र सुलेमान मिर्झा उर्फ सुंदर शेखर यांनी केला. संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला आहे. संजय राऊत यांनी ते वक्तव्य मागे देखील घेतले.

यावर बोलताना सुलेमान मिर्झा म्हणाले की इंदिरा गांधी करीम लाला, हाजी मस्तान यांना भेटायच्या. मी त्यांना पाहिले आहे, परंतु लांबून. कारण ते बोलताना कोणी त्यांच्याजवळ जाऊ शकतं नव्हतं. करीम लाला, हाजी मस्तान हे काँग्रेसचे होते. संजय राऊत जे बोलले ते सत्य बोलले, बाळासाहेब ठाकरे यांचे देखील हाजी मस्तान यांच्यासह चांगले संबंध होते.

करीम लाला, हाजी मस्तान हे लोक मंत्रालयात जायचे तेव्हा सर्व लोक मंत्रालयाच्या खाली त्यांना भेटायला यायचे का या प्रश्नाचा देखील सुलेमान मिर्झा यांनी खुलासा केला. ते म्हणाले की लोकांचे त्यांच्यावर प्रेम होते म्हणून त्यांना भेटायला लोक प्रेमाने येत असतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/