धक्कादायक ! पोलिसांच्या त्रासाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या 

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांनी एका गुन्ह्यात गोवले आणि त्रास दिल्याच्या कारणावरून मागील महिन्याभरापसून तणावात असलेल्या एका अपंग व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपुर्वी त्याने पोलीस अधिक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार व पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून एका पोलिसाने त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे त्यात म्हटले आहे. बुधवारी दुपारी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुदेश प्रभाकर भारती (वय ४४) असे आत्मह्या करणाऱ्याचे नाव आहे.

असा आहे प्रकार

सुदेश हा रिक्षाचलक होता. तो एका हाताने अपंग आहे. सावळेविहीर येथील तरुणाला मोबाईल घ्यायचा होता. त्यानंतर सुदेश भारतीने त्याला चांदेकसाऱ्याच्या तरुणाचे नाव सांगितले. त्यानंतर सावळेविहिरच्या तरुणाने मोबाईल घेतला. मात्र पोलिसांनी पकल्यावर सावळेविहिरच्या तरुणाने सुदेशचे नाव सांगितले. त्यानंतर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या कुटुंबियांना काहीही माहिती न देता महिनाभरापुर्वी त्याला रात्री घरातून जेवण करत असताना उचलूननेले. त्यानंतर पोलिसांनी त्याला आणखी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत त्याच्या पत्नीकडून पैसे उकळले. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता.

काय लिहीले सुसाईडनोटमध्ये

सुदेशने आत्महत्येपुर्वी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात बाबूराव क्षीरसारगर (सावळेविहीर) अन्वर मन्सूर शेख (चांदेकसारे) या दोघांनी आपल्याला चोरीच्या गुन्ह्यात गोवले आहे. तर एलसीबीने घरातून उचलून नेले आणि शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी चव्हाण यांनी पत्नीकडून ४० हजार रुपयांची मागणी करत ते नाही दिल्यास मोठ्या जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पत्नीने उसनवार करून पैसे भरले. माझ्यावर अन्याय झाला आहे. अपंगांसाठी केलेला कायदा कुठे गेला असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

पंधरा दिवसांपुर्वीच मुलीचे लग्न झाले मात्र …

पंधरा दिवसांपुर्वी सुदेशच्या मुलीचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या तयारीसाठीही तो बाहेर पडला नाही. तसेच लग्नातही गप्प गप्प होता. दरम्यान काल घरी कुणी नसताना त्यांनी आत्महत्या केली.

Loading...
You might also like