Hanuman Teaser | ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; थेट ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’बरोबर तुलना

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Hanuman Teaser | मध्यंतरी ‘आदिपुरुष’चित्रपटामध्ये वापरलेल्या व्हीएफएक्सची लोक थट्टा करत होते. या चित्रपटावरही अनेक कारणावरून वाद निर्माण झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाच्या टीझरमुळे आदिपुरुष हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Hanuman Teaser)

 

नुकताच आगामी तेलुगु सुपरहिरो चित्रपट ‘हनुमान’ चा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर लोकांच्या पसंतीस पडल्याचे पाहायला मिळाले. या टीझरमध्ये वापरलेले इफेक्ट आणि याची मांडणी प्रेक्षकांना आपलेसे करून घेत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट लो बजेट देखील असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीझरची तुलना थेट ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटाबरोबर केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर या संदर्भातील पोस्ट जोरात व्हायरल होताना दिसत आहेत. (Hanuman Teaser)

 

या चित्रपटात अभिनेता तेजा सज्जा हनुमानाच्या अवतारात दिसणार आहे. हा एक सुपरहिरो चित्रपट असणार आहे. आत्ताच्या काळातील हनुमानासारखा सुपर हिरो ज्याची तुलना इतिहासातील हनुमानाच्या संदर्भात करण्यात आली आहे. चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. तर चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी याची तुलना आदिपुरुष या चित्रपटाशी करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात कोणताही मोठा सुपरस्टार नसून कमी बजेटचा चित्रपट असून देखील हा चित्रपट बॉलीवूड सारख्या चित्रपटावर भाडी पडू शकतो असे नेटकऱ्यांनी टिझर पाहून यावर कमेंट केली आहे.

 

प्रशांत वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून याआधी त्यांनी ‘ऑ’ या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे.
‘ऑ’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
तर आता त्यांचा हनुमान हा चित्रपट हिंदीसह तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.
आता टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरता लागली आहे.

 

Web Title :- Hanuman Teaser | telugu superhero film hanuman teaser released netizens says it has better vfx than adipurush

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss 16 | सुम्बुल तौकीर खानच्या वडिलांनी तिला दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या नक्की काय म्हणाले…

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने वाढदिवशी शेअर केली ‘हि’ खास पोस्ट; पोस्ट व्हायरल

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ