Hanumant Nazirkar | लाचखोरीतून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता ! निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

पुणे : पुणे पोलीसनामा ऑनलाइन – नगररचना विभागात (Nagar Rachna Department) सहसंचालक (Co-Director) असताना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी निलंबित (Suspended) करण्यात आलेल्या हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळून (Bail Application Rejected) लावला आहे. न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग (Justice C.V. Bhadang) यांनी हा निर्णय दिला आहे. गेल्या 13 महिन्यापासून हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) तुरुंगात आहे. हनुमंत नाझीरकर याने लाचखोरीतून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा केली.

 

हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau (ACB) विभागाने बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली. यानंतर नाझीरकर याचे निलंबन करण्यात आले. नाझीरकर याने 23 जानेवारी 1986 ते 18 जून 2020 या 34 वर्षामध्ये तब्बल  82 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता लाचखोरीतून जामा केल्याचे तापासात उघड झाले आहे. त्याच्याकडे 1152 टक्के अधिकची मालमत्ता आढळून आली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हनुमंत नाझीरकर याच्या नावे आणि भागीदीरी असलेल्या 37 कंपन्या आढळून आल्या. तसेच बारामती पोलीस ठाण्यात (Baramati Police Station) दाखल असलेल्या फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यामध्ये 24 मार्च रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) त्याला अटक केली होती.

हनुमंत नाझीरकर याने सत्र न्यायालयात (Sessions Court) जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
विशेष सरकारी वकील राजा ठाकरे (Special Public Prosecutor Raja Thackeray) यांनी यांनी बाजू मांडताना सांगितले की, आरोपी एका महत्त्वाच्या पदावर काम करीत होता.
त्याने आपल्या पदाचा गैरवापर करुन मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमविली आहे. तसेच त्याच्या नावावर आणि भागीदारीत असलेल्या 37 कंपन्यांबाबत तपास अद्याप सुरु आहे.
त्यामुळे त्याला जामीन मिळाला तर पुराव्यामध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने बारामतीमधील फसवणूकीच्या गुन्ह्यात नाझीरकर याचा जामीन मंजूर केला.
मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन फेटाळून लावला.

 

Web Title :- Hanumant Nazirkar | pune bribe case acb pune ! Suspended Joint Director Hanumant Nazirkar’s bail application rejected by bombay mumbai High Court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weather Updates | आगामी 5 दिवस ‘या’ भागात अलर्ट; हवामानाची स्थिती काय? जाणून घ्या

 

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | मी हिंदू, मागील जन्मावर आणि पुनर्जन्मावर विश्वास, 1857 च्या युद्धातही लढत असेन; देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

 

BP Control Tips | उन्हाळ्यात ‘ब्लड प्रेशर’ वाढणे ठरू शकते धोकायदायक, ‘या’ 5 ड्रिंक्सने करा बीपी कंट्रोल