वाढदिवसानिमित्त केदार जाधवचे धोनीला मराठीतून भावनिक पत्र !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी धोनी म्हणजे एक आशा आणि युवा खेळाडूंसाठी धोनी म्हणजे एक प्रेरणास्थान. धोनीमुळे भारताला अनेक चांगले युवा खेळाडू मिळाले. त्यातलाच एक म्हणजे केदार जाधव आहे. वाढदिवसानिमित्त केदार जाधवचे धोनीला मराठीतून भावनिक पत्र लिहले आहे.

केदार जाधवने खूप उशीरा क्रिकेटमध्ये पदार्पण केले होेते. मात्र धोनीला त्याला कायम साथ दिली. आज धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदारने माही भाईसाठी एक खास पत्र लिहिले. या पत्रातून धोनी विषयी भावना व्यक्त केल्या. जाधवने पत्रात, क्रिकेट कसे खेळायचे यासोबत आयुष्य कसे जगायचे हेही तुम्ही शिकवलत अशा भावना व्यक्त केल्या. केदारने पत्रात धोनीला समुद्रातील लाइटहाऊस म्हटले आहे. ज्याप्रमाणे लाइटहाऊस दिशा दाखवण्याचे काम करत, दिशा दाखवताना उजेड देते, लाटाही झेलते, अगदी तुमच्यासारखे! तुम्ही कित्येकांना आनंदाचे क्षण दिले, दिशा दाखवली, टीका होत असताना खंबीरपणे उभे राहिलात, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.