आता आफ्रिदी गेला खड्ड्यात देशासाठी मी बंदूकही उचलेन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. काश्मीरी जनतेचा त्राास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे अशा आशयाचे ट्विट आफ्रिदी याने केले. मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावे लागेल, अशीही गरळ त्याने ओकली. यावरून फिरकीपटू हरभजन सिंगने आफ्रिदी आणि माझा आता काहीही संबंध नाही, असे म्हणत त्याला चांगलेच सुनावले आहे.

माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल शाहिद आफ्रिदी जे काही बोलला, ते खूपच चुकीचे आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आफ्रिदीच्या कोरोनाबाबतच्या उपक्रमाला आम्ही मदतीचे आवाहन करावे असे त्याने सांगितले म्हणून आम्ही आवाहन केले होते. आम्ही माणुलकीच्या नात्याने त्याच्या उपक्रमाला मदत केली कारण तो कोरोनाबाधितांना सहाय्य करत होता. पण हा माणूस आमच्याच देशाबद्दल वाईट बोलतो.

आता खड्ड्यात गेला शाहिद आफ्रिदीत्याला भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावे, असे सडेतोड मत हरभजनने व्यक्त केले आहे. मी 20 वर्ष माझ्या देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. त्यामुळे मी माझ्या देशाविरोधात काही केलेे का असे बोलायचा कोणालाही अधिकार नाही. आज असो किंवा उद्या देशाला माझी गरज भासली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाणारा मी पहिला असेन, असेही हरभजन म्हणाला.