जेटच्या विमानाचे हवेतच हेलकावे; दोनदा वाचले भुजबळ, खासदार प्रीतम मुंडे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईहून औरंगाबादच्या दिशेने निघालेले जेट एअरवेजच्या विमानाने उड्डानानंतर वीस मिनीटांत हवेतच हेलकावे खायला सुरुवात केली.  यामुळे आतील प्रवशांचे हृदयाचे ठोके चुकले. या विमानात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रीतम मुडे यांच्यासह प्रवाशी प्रवास करत होते. दोनदा हेलखावे खात हे विमान वेगाने खाली येऊ लागले. हा थरार १० मिनिटे सुरु होता. योग्य वेळी या विमानाने ठराविक उंची गाठल्याने सर्वांचे प्राण वाचले

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e344f61a-c3e3-11e8-a59c-c1cbc23b5484′]

विमानाचा  हवेत थरार अनुभवल्यानंतर जीव भांड्यात पडतो न पडतो तोच औरंगाबादमध्ये उतरताना हाच अनुभव प्रवाशांना आला. विमान धावपट्टीवर उतरवताना जोरदार धक्के जाणवले. यामध्ये या डॉक्टरचे डोके विमानात आदळले. काहींनी उलट्यांचा त्रास झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हे विमान मुंबईहून संध्याकाळी 4.46 वाजता निघाले होते.
[amazon_link asins=’B078124279,B0756Z53JN,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0455c3e-c3e3-11e8-9823-07816ff5619b’]
या विमानामध्ये राष्ट्रवादीचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळही होते. तसेच खासदार प्रीतम मुंडे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, काँग्रेसचे डॉ. जितेंद्र देहाडे आदी प्रवास करत होते. या थरारक प्रवासावेळी एका डॉक्टरचे डोके विमानात आदळल्याने त्यांनी याची तक्रार विमान कंपनीकडे केली आणि घटना उघड झाली. या डॉक्टरला एका खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांचे अहवाल नॉर्मल आल्यानंतर प्रकरण सामंज्यस्याने मिटविण्यात आले.

या बाबत विमानतळ आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले.

जाहिरात