हार्दिककडून विराटला दमदार प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हार्दिक पांड्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बर्‍याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. अनोख्या पुश-अप्सची चाहत्यांना भुरळ पडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाल्याचे दिसून आले.

हार्दिकने ‘फ्लाईंग पुश-अप्स’मध्ये थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह त्याने हवेत असताना टाळ्याही वाजवून दाखवल्या. या नव्या ट्विस्टवर चाहते भलतेच खुश झाले. पण हार मानणे हे टीम इंडियाच्या खेळाडूंच्या रक्तातच नाही. त्यामुळेच हार्दिकने कोहलीला दमदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याने फ्लाईंग पुश-अप्स मारल्या. हवेत असताना टाळ्यादेखील वाजवल्या, पण महत्त्वाचे म्हणजे त्याने मागच्या बाजूला टाळ्या वाजवण्याचा पराक्रम करून दाखवला.