मैदानावरच भिडले ‘पांड्या बंधू’, डोक्यावर मारल्यामुळं हार्दिकनं कृणालकडे मागितली माफी (व्हिडीओ)

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या तीनही मालिकांमधील एकही सामन्यात भारतीय संघाचा हिस्सा नसलेला हार्दिक पांडया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी सज्ज आहे. यासाठी हार्दिक जोरात तयारी करत असून तो आपला भाऊ कृणाल पांड्या बरोबर हि तयारी करत आहे. दोघे भाऊ मिळून सराव करत असून टी-20 मालिकेसाठी दोघांचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे दोघेही अष्टपैलू भाऊ या मालिकेत कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कृणालच्या गोलंदाजीवर जोरदार फटके
हार्दिकने आपल्या सराव सत्राचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला असून यामध्ये तो मोठे फटके खेळताना दिसून येत आहे. कृणालच्या गोलंदाजीवर त्याने चहू बाजूला मोठे फटके खेळलेले यामध्ये दिसून येत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या फटक्यांचा समावेश होता. भारतीय संघात हार्दिक पांड्या फिनिशर असून त्याने सरावावेळी देखील मोठे फटके खेळलेले दिसून येत आहेत.

तुझं डोकं उडवलंच होते
त्यानंतर हार्दिक पांड्याने ट्विटरवर कृणाल पांड्याची मोठ्या प्रमाणात मस्करी आणि चेष्टा केली. त्याने ट्विट करत म्हटले कि, या राउंडमध्ये मो बाजी मारलेली आहे मोठ्या भावा, त्याचबरोबर मी तुझे डोके जवळजवळ उडवलेच होते,यासाठी मला माफ कर, असेदेखील त्याने ट्विटमध्ये खाली लिहिले होते.

15 सप्टेंबरला पहिला टी-20 सामना
मोठ्या विश्रांतीनंतर हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करत असून तो मागील काही दिवसांपासून दुखापतीने ग्रासलं होता. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी तो खूप उत्सुक आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली(कर्णधार ) रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, क्रुणाल पंड्या, दीपक चाहर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद

आरोग्यनामा ऑनलाइन –