Hardik Pandyas Brother Arrested | फसवणूक प्रकरणात हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hardik Pandyas Brother Arrested | मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोघांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी त्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला Vaibhav Pandya (वय-37) अटक केली आहे. हार्दिकच्या सावत्र भावावर 4.3 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या (Mumbai EoW) अधिकाऱ्यांनी सांगितली.(Hardik Pandyas Brother Arrested)

वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यवसाय होता. या व्यवसायात वैभव याने 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत हार्दिक आणि कृणाल पांड्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर वैभव पांड्याला आज अटक केली आहे. वैभव पांड्यासोबत क्रिकेटर पांड्या बंधूंनी मुंबईमध्ये व्यवसाय सुरु होता. पण या फर्ममधून वैभव याने 4.3 कोटी रुपये वळते केले. याचा फटका हार्दिक आणि कृणाल पांड्याला बसल्याचे पोलिसांनी सांगितले. खोटी सही करुन फसवणूक केल्याचा वैभव याच्यावर आरोप असल्याचेही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

हार्दिक पाड्या, कृणाल पांड्या आणि वैभव पांड्या यांनी 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यावसाय सुरु केला होता.
कृणाल आणि हार्दिक हे दोघे प्रत्येकी 40 टक्के भांडवल घलतील, तर वैभव 20 टक्के भांडवल देईल, त्याशिवाय तो दैनंदिन कामकाज हाताळेल.
या कंपनी मधून मिळणारा नफा तिघांमध्ये समान वाटला जायचा.
पॉलिमर व्यवसाय व्यवस्थित सुरु असतानाच, वैभवने त्याच व्यापारात अन्य फर्म स्थापन केली.
याबाबतची इतर दोघांना कोणतीही कल्पना किंवा माहिती दिली नाही. एकाच वेळी दोन फर्म असल्याने नफा कमी झाला.
त्यामुळे जवळपास तीन कोटींचे नुकसान झाले. वैभवने आपल्या नफ्याची टक्केवारीही गुपचूप वाढवली.
त्याने आपला नफा 20 टक्क्यांवरुन 33.3 टक्क्यांवर नेला. त्यामुळे हार्दिक आणि कृणाल पांड्याचं मोठं नुकसान झालं.

वैभव पांड्याने भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटींपेक्षा जास्त रुपये घेऊन स्वत:च्या खात्यावर पैसे वाळवले.
ही बाब हार्दिक आणि कृणाल यांना समजली. त्यांनी वैभवकडे याबाबत विचारणा केली असता त्याने तुमची बदनामी करेल अशी धमकी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरूरमध्ये भाजपला ‘दे धक्का’, अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार!

Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | आमची लढाई ही दडपशाही विरोधात, सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र