विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचं ब्रेकअपबाबत पुन्हा एकदा वक्तव्य, म्हणाली…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि हरलीन सेठी यांचा काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाला आहे. त्यांच्या ब्रेकअप बद्दल बोलताना हरलीन सेठी म्हणाली, कि जे काही झाले ते चांगलेच झाले. नुकतीच हरलीन सेठी आणि विकी कौशल यांच्या ब्रेकअप बद्दल एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत हरलीन सेठी म्हणाली, मी खरे सांगते मला त्याचे जास्त काही वाईट वाटलं नाही पण माझ्या परिवाराला आणि माझ्या मित्र परिवाराला जास्त वाईट वाटलं. प्रत्येक माणसाची एक वेगळी ओळख असते. मी ह्या गोष्टींमुळे कधीच स्वतःला कमी समजत नाही की मी एका फिल्म स्टार सोबत रिलेशनशिप मध्ये असून सुद्धा एकही सिनेमा केला नाही. मी अजूनही स्वता:वर प्रेम करते, मला हरलीन सेठी या माझ्या नावाने लोकांनी ओळखले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कोणी जर मला एक्स गर्लफ्रेंड म्हणत असाल तर ते चुकीचे आहे.

हरलीन सेठी नुकतीच ‘ब्रोकन एंड ब्यूटीफुल’ या वेब सिरीज मध्ये झळकली होती. त्यामध्ये तिने केलेल्या कामाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. तिच्या ब्रेकअप नंतर हरलीनला झालेल्या त्रासाचा, वेब सिरीज मध्ये तिला फायदाच झाला. यावर हरलीन सेठी म्हणाली, एका अभिनेत्याला आपल्या रिअल लाईफ मध्ये वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेणं गरजेचं असतं.

विकी कौशलने काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत सांगितले की मी सिंगल आहे. मुलाखतीच्या दरम्यान विकी कौशलला एक प्रश्न विचारला गेला की तू सिंगल का आहेस ? यावर तो म्हणाला हो मी सिंगलेच आहे. विकी कौशल ने आपल्या ब्रेकअपच्या आधी काही मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिप बाबत बोलला होता. कॉफी विथ करण शो मध्ये त्याने आपल्या रिलेशनशिप बद्दल कन्फर्म सांगितलं होतं. त्यांच्या दोघांच्या ब्रेकअप बद्दल तेंव्हा कळलं होतं जेंव्हा हरलीनने विकी कौशलला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. तेंव्हा त्यांचं ब्रेकअप झाल्याचं उघडकीस आलं होतं.