हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पद्मश्रीपुरस्कार विजेते ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.  त्यांना क्षयरोगानं जडल्याने  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.

तुळशीदास बोरकर यांचा जन्म  १८ नोव्हेंबर १९३४ मध्ये संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातील बोरी गावामध्ये  झाला होता.   तुळशीदास बोरकर लहानपणीच गोवा सोडून पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fee70b5-c3c4-11e8-a533-e944261b5654′]

हार्मोनियमबरोबरच ऑर्गनवरही त्यांचं प्रभुत्व होतं

‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’, ‘मत्स्यगंधा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘मदनाची मंजिरी’, ‘ययाती देवयानी’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘शाकुंतल’, ‘मेघमल्हार’ आणि इतर अशा संगीत नाटकांमधून त्यांच्या ऑर्गनवादनाची जादू रसिक श्रोत्यांनी अनुभवली आणि ऐकली. त्यांनी संगीतसाथ केलेल्या नाटकांच्या प्रयोगांची एकूण संख्या सुमारे आठ ते दहा हजार आहे. पं. बोरकर यांचे संवादिनीवादनाचे पाचशेहून अधिक कार्यक्रमही विविध ठिकाणी झाले आहेत. विशेष म्हणजे या त्यांना या कारकिर्दीत उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8995ebe-c3c4-11e8-9865-d73d7e79c471′]

बोरकर यांनी आपल्या हार्मोनियम वादनानं केवळ शास्त्रीय संगीताच्या रसिकांना आनंदच दिला नाही, तर ते अखेरपर्यंत ज्ञानदान करत राहिले. मालाडच्या महापालिका शाळेत  १९७३ ते १९९६ अशा कालावधीत त्यांनी संगीत शिक्षक म्हणून सेवा बजाविली. त्यांनी अनेक शिष्योत्तम घडवले. बोरकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे तंत्र शिकलेले अनेक शिष्य आज स्वतंत्रपणे शास्त्रीय संगीताचा प्रसार करत आहेत. वयाच्या ८३ वर्षापर्यंत ते दररोज संध्याकाळी किमान तासभर ते आवर्जून रियाज करायचे.
शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.